शांताई विद्या आधार या अंतर्गत रद्दीतून बुद्धीकडे उपक्रमात एका वर्षात तब्बल १२७ गरीब विध्यार्थ्यांना मदत देण्यात आली आहे. पाच वर्ष जुन्या संस्थेने २०१७-१८ या वर्षात विविध ठिकाणची रद्दी गोळा करून त्याच्या विक्रीतून शहरातील विविध शाळातील १२७ विध्यार्थ्यांना दोन लाख २५ हजारांची आर्थिक शैक्षणिक मदत करण्यात आली आहे.
भरतेश मध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते विद्या आधारचे अध्यक्ष विनायक लोकूर यांनी स्वागत केल.अनाथ आणि बेड पडून असलेल्या रुग्णाची शुश्रुषा करणाऱ्या जिल्हा सिव्हील हॉस्पीटलच्या क्लास चार च्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.सचिन मुत्नाळे,रेखा चव्हाण,दशरथा जाधव,केम्पव्वा हिरेमठ,द्यामाव्वा कांबळे,लता मानकोसकर,गीता हलगी,शुभद्रा पुजेरी आदीचा सत्कार झाला.
विद्या आधारने विज्ञान विकास आणि न्यू गर्ल्स हाय स्कूल या दोन शाळांना दत्तक घेतले असून विध्यार्थ्यांना दोन लाख २५ हजार रुपये वितरीत करण्यात आले. भरतेश शिक्षण संस्थेच्या वतीने अध्यक्ष राजीव दोद्द्न्नावर यांनी विद्या आधारला चार टन रद्दी देत संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. गेली चार वर्षे भरतेश शिक्षण संस्था रद्दीची मदत करत आहे.यावेळी विकी पाटील डॉ सोनाली सरनोबत,तानाजी सरोळकर,डॉ ज्योती कामत यांच्या सह रोटरी क्लब आणि डॉल्फिन ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.यावेळी माजी महापौर विजय मोरे,विजय आचमनी, दीपक गोजेकर,प्यास चे डॉ मधव प्रभू आदी उपस्थित होते.