खानापूर वन विभागातील वृक्ष संपदा वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र ती विखुरलेली आहे. ती एकत्रित पाहता यावी यासाठी कुंडल या गावी आता वनविभाग ट्री पार्क विकसित करत आहे.
या पार्क मध्ये सर्व जातीची झाडे आणि त्यावर आकर्षित होणारे पक्षी पाहण्याची संधी मिळणार आहे.१०० एकर जागेत हा पार्क असेल, खानापूर शहर पासून फक्त २ किमीवर हा पार्क असेल. विध्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि संशोधक वर्गासाठी हा पार्क एक पर्वणी असेल.
राज्य सरकारने या प्रकल्पासाठी ५० लाख रुपये निधी दिला आहे. यातून वॉकिंग ट्रॅक, मैदान, खुर्च्या, उद्यान, स्वच्छतागृहे, ट्री झोन विकसित केला जाणार आहे. प्रत्येक झाडावर त्याचे स्थानिक आणि वैज्ञानिक नाव लिहिले जाणार आहे.
पर्यटक आणि छायाचित्रकार या पार्क मध्ये सतत येतील कारण तिथे फळझाडेही असतील व त्यावर निरनिराळ्या जातीचे पक्षीही आकर्षित होतील असा विश्वास वनविभागाला वाटतो.