केवळ झाडे लावून उपयोग होणार नाही तर ग्रीन बेळगाव करण्यासाठी ती जगवली पाहिजेत असे मत ग्रीन ग्लोबल इंडियाचे अध्यक्ष सचिन गोरले यांनी व्यक्त केले.
हुंचेनहट्टी येथील मराठी शाळेच्या पटांगणात वृक्षारोपण केल्यावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत अध्यक्ष राकेश तलवार होते. यावेळी मच्छे विभाग क्लस्टर मुल्ला,ग्रीन ग्लोबल उपाध्यक्ष अनिल भोईटे,कार्याध्यक्ष मुकेश पुरोहित,तालुका अध्यक्ष सचिन राऊत,ग्राम पंचायत सदस्य यल्लापा पाटील,सुनील मोहिते,प्रमोद मुचंडीकर,शंकर बुरुड आदी उपस्थित होते.
गोरले पुढे म्हणाले आजच्या युगात माणूस माणसाची साथ देत नाही मात्र वृक्ष नक्कीच मानवतेचा साथ देऊन मदत करत असतो प्रत्येकाच्या नक्षत्राच झाड असल पाहिजे एक झाड जागवण्याचा मानस केला पाहिजेत. मागील वर्षी ग्रीन ग्लोबल या शाळेच्या पटांगणात ३० झाडे लावली होती त्यातील २५ जगवली आहेत आता पुन्हा शुक्रवारी ३५ झाडे लावण्यात आली.