आजच्या स्पर्धात्मक युगात विध्यार्थ्यांना घडवण्यात शिक्षकांचे योगदान मोठे आहे म्हणून शासनाने शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा सत्कार करण्याचे ठरवले आहे. असे मत जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ रामचंद्रन राव यांनी व्यक्त केले.
मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या एस एस एल सी परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवलेल्या विध्यार्थ्यांच्या शिक्षकांचा सत्कार शिक्षण खात्याच्या वतीने करण्यात आला. गुरुवारी सकाळी जिल्हा पंचायत सभागृहात शिक्षा खाते आणि जिल्हा पंचायतीच्या वतीने बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील एकूण ४३२ गुरुजनांना गौरवण्यात आले.
जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ रामचंद्र राव आणि जिल्हा शिक्षणाधिकारी ए बी पुंडलिक यांनी आळी पाळीने जमलेल्या हाय स्कूल शिक्षकांचा सत्कार केला. सकाळी ९ ते दुपारी एक च्या दरम्यान बेळगाव शहर खानापूर आणि बेळगाव ग्रामीण भागात तर दुपारच्या सत्रात कित्तूर,रामदुर्ग ,बैलहोंगल आई सौंदत्ती येथील शिक्षकांनी सत्कार समारंभास हजेरी लावली होती.