लोकरीच्या विणकामात विविध प्रयोग करून नवनिर्मितीचा सतत ध्यास घेतलेल्या करण्यात आशा पत्रावळी यांच्या लोकरीच्या विणकामाच्या कलेची दखल इनक्रेडिबल बुक ऑफ रेकॉर्ड्सने घेतली आहे.आजवर आशा पत्रावळी यांनी विणकामात बजावलेल्या कामगिरीचा त्यांनी त्यांच्या प्रमाणपत्रात उल्लेख केला आहे.पाच हजारहून अधिक निरनिराळ्या प्रकारचे स्वेटर,उषा,पक्षी,प्राणी ,फळे,कार्टूनची पात्रे आदींची विणकामाद्वारे त्यांनी निर्मिती केली आहे असा गौरवपूर्ण उल्लेख प्रमानपत्रात करण्यात आला आहे.
रशियन पद्धतीचा अवलंब करून सध्या त्यांनी स्वेटर विणण्यास प्रारंभ केला आहे.केवळ रशियन स्वेटर्सचे फोटो बघून त्यांनी अथक प्रयत्न करून रशियन विणकामाची कला अवगत करून घेतली आहे.त्यांचे शिक्षण केवळ दहावीपर्यंत झाले असून विणकाम या विषयावरील त्यांची सहा पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.आजवर अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या लोकरीच्या वस्तूंचे प्रदर्शन भरवले आहे.अनेक सेवाभावी संस्थांमध्ये त्यांनी अनेक महिला आणि तरुणींना लोकरीच्या विणकामाचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी होण्यास मदत केली आहे.अनेक पुरस्कारही त्यांना लाभले आहेत.