बेळगाव स्मार्ट शहराला एक जबाबदार अधिकारी किंवा नगरसेवकांची गरज आहे. हनुमान नगर भागात एक बिल्डिंगचे सांडपाणी सरळ रस्त्यावर वाहत आहे. याभागात तर ही गरज जास्तच आहे.
हनुमान नगर सेकंड स्टेज जवळील पी टी कॉलनीत ही परिस्थिती आहे. त्या बिल्डिंग ची ड्रेनेज पाईप फुटून सांडपाणी उघड्यावर वाहत आहे. डासांना जन्म घेऊन पसरण्याची चांगली संधी याद्वारे देण्यात आली आहे.
संबंधित नगरसेवक किंवा मनपाचा कुठला अधिकारी या प्रकाराकडे लक्ष देत नाही.नागरिकांनी असंख्य तक्रारी केल्या तरी पाहिले जात नाही. लवकर दुरुस्ती न झाल्यास हे घाण पाणी सगळीकडे पसरून जास्त दुर्गंधी पसरण्याचा धोका आहे.
इमारतीचे बांधकाम करणारा बिल्डर हे काम मनपाचे आहे असे सांगत आहे. मनपा वाले शांत आहेत ते बिल्डर ने हे काम करावे असे सांगून गप्प आहेत. पाऊस सुरू झाला असल्याने आता हे पाणी सगळीकडे पसरून जास्त धोका निर्माण होणार आहे.
या नागरिकांना कुणी जबाबदार मिळेल का?