देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेविषयी परिसंवादात सहभागा विषयी भाजप राष्ट्रीय किसान मोर्चाचे उपाध्यक्ष शंकर गौडा पाटील यांनी परराष्ट्र राज्यमंत्री माजी मेजर जनरल व्ही के सिंह यांच्यासोबत चर्चा केली.
ग्लोबल स्ट्रेटेजीक पॉलिसी फौंडेशन पुणे आणि केडी पीएमजीआय ग्रुप दिल्ली या संस्थेच्या वतीने आगामी 17 जून रोजी नवी दिल्ली येथील रफी मार्ग येथील स्पीकर सभागृहात सकाळी 9 ते दुपारी एक या वेळेत अंतर्गत राष्ट्रीय सुरक्षा(दिल्ली एन सी आर) विषयक परि संवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
शंकरगौडा पाटील यांनी ग्लोबल स्ट्रेटेजीक पॉलिसी फौंडेशन पुणे आणि केडी पीएमजीआय ग्रुप दिल्ली यांच्या वतीने व्ही के सिंह यांच्याशी चर्चा केली.
या परिसंवासदात केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहिर हे ‘देशाचीअंतर्गत सुरक्षा’पर राष्ट्र राज्य मंत्री व्ही के सिंह हे ‘आंतरराष्ट्रीय धोरणात्मक वातावरण’आदी अधिकारी यात सहभागी होणार आहेत.