राज्य मंत्रीमंडळ विस्तारात माजी मंत्री सतीश जारकीहोळी यांचा पत्ता शेवटच्या क्षणी कट करण्यात आला याचा तीव्र निषेध व्यक्त करत जिल्हा पंचायत उपाध्यक्षा सह अनेक लोक प्रतिनिधी,जिल्हा पंचायत तालुका पंचायत ग्राम पंचायत सदस्यांनी राजीनामा देण्याचा इशारा पत्रकार परिषदे द्वारे दिला आहे.
शुक्रवारी सकाळी हॉटेल मिलन येथे जिल्हा पंचायत उपाध्यक्ष अरुण कटांबळे यांच्यासह अनेक सतीश समर्थकांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे.मंत्री मंडळ विस्तारात शेवटच्या क्षणी सतीश यांचा पत्ता राज्यातील नेत्यांनी कट केला असून राज्यात सतीश यांच्या मुळेच काँग्रेस आमदारांची संख्या वाढली आहे असं मात्र त्यांना डावलल्यामुळे15 जिल्हा पंचायत सदस्य,28 तालुका पंचायत, ए पी एम सी आणि नगरसेवक ग्राम पंचायत सदस्यांनी राजीनाम्याचा इशारा दिला आहे. शब्दाला न जाणणाऱ्या राज्यातील काँग्रेस हाय कमांडला आमचा विरोध असून सामूहिक राजीनामा देऊ असा इशारा त्यांनी दिलाय.
जि पं उपाध्यक्ष अरुण कटांबळे यांनी आजच प्रादेशिक आयुक्त कार्यालयात जाऊन राजीनामा देणार अशी घोषणा केली केवळ सतीश नव्हे तर त्यांचे काही समर्थक आमदार देखील राजीनामा देतील अस वक्तव्य यावेळी झालं.डॉ जी परमेश्वर, सिद्धरामय्या, के सी वेणूगोपाल अहमद पटेल यांच्या मुळेच सतीश यांना मंत्रिपद मिळाले नाही असाही आरोप करण्यात आला.डी सी आर सी यांच्या माध्यमातून राजीनामे दिले जातील अशी माहिती दिली.सिद्दनगौडा पाटील,जयश्री माळगी, गंगाधर स्वामी,कृष्णा अनगोळकर आदी उपस्थित होते.