जिल्यात ग्रामविकास अधिकारी(पीडिओ) कमी असल्यामुळे अनेक विकास कामे खुंटली होती. त्याचबरोबर अनेक ग्राम पंचायतीमध्ये ग्रामसेवकांवर ग्रामपंचायतची धुरा देण्यात आली होती. यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे राज्य सरकारने जिल्यात ग्राम विकास अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे.
जिल्याबरोबरच तालुक्यातील अवस्थाही तशी होती. बेळगाव तालुक्यात ९ ग्राम विकास अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये ८ पुरुष तर १ महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे आता तालुक्यातील विकास कामांना चालना मिळणार आहे.
मागील कित्येक वर्षांपासून ग्राम विकास अधिकाऱ्यांची मागणी सातत्याने करण्यात येत होती. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. नवीन कुमारस्वामी सरकारने याकडे लक्ष दिल्याचे दिसून येत आहे. जिल्यात सुमारे ५० हुन अधिक ग्राम विकास अधिकार्यांची नेमणूक झाल्याची माहिती उपलबध झाली आहे.
Trending Now