एआयसीसी चे सचिव, यमकनमर्डी चे आमदार, माजी अबकारी मंत्री तसेच बेळगाव जिल्ह्याचे माजी पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांना कर्नाटक मंत्रीमंडळात स्थान मिळाले नाही.
यामुळे त्यांचे समर्थक भडकले आहेत. त्यांची नाराजी त्यांनी आंदोलनातून दाखवून दिली आहे.
गुरुवारी संतप्त झालेल्या जारकीहोळी यांच्या समर्थकांनी येथील क्लब रोडवरील काँग्रेस पक्ष कार्यालयावर हल्ला केला. यावेळी कार्यालयावरील बॅनर्स फाडण्यात आले. कार्यालयासमोरील कुंड्या फोडण्यात आल्या. कार्यालय बंद असल्यामुळे त्यांना आत प्रवेश करता आला नाही. जारकीहोळी समर्थकांनी काल बंगळूर व बेळगावात आंदोलन केले होते.
गुरुवारी थेट खळ खट्याक वर ते उतरले. सतीश यांचे मोठे बंधू रमेश यांना मंत्रिपद दिले यातून हा वाद उफाळला आहे. हे प्रकार युती सरकारच्या भवितव्याच्या दृष्टीने घातक ठरत आहेत.