जून १ रोजी धोका होता. रेल्वेचा अपघात होण्याची शक्यता होती. पाऊस भरपूर होता. मात्र बेळगाव रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्तर सुरेंद्र प्रकाश यांच्या प्रसंगावधानाने शेकडो प्रवाशांचे जीव वाचवले आहेत.
भरपूर पावसाने आणि जोर वाऱ्यामुळे एक झाड रेल्वे ट्रॅक वर पडले होते. हरिप्रिया एक्सप्रेस जाण्याची ती वेळ होती.
सुरेंद्र प्रकाश त्यावेळी ड्युटीवर होते. एल सी गेट क्र ३८२ बंद आहे की नाही याची खातरजमा करताना हे झाड पडल्याची माहिती त्यांना मिळाली.
दुसऱ्या व तिसऱ्या रेल्वे गेट च्या दरम्यान हे झाड पडले होते.सुरेंद्र प्रकाश यांनी लागलीच एल पी व गार्ड ला फोन केला. गेटमन ला सांगून ट्रेन थाबवण्याची सूचना केली. यामुळे अनर्थ टळला आहे.
या स्टेशन मास्तर चा यथोचित गौरव आवश्यक आहे.