मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. पडलेल्या पावसामुळे मार्केट मध्ये भाजी नसल्यामुळे दरात वाढ झाली होती. मात्र बुधुवारी पावसाने उघडीप दिल्यामुळे भाजी पाल्यात मोठी घट झाली आहे.
कोथंबीर मंगळवारी १००० रुपयांना १०० पेंढी होती ती बुधवारी ३०० रुपयांपर्यंत पोचली. सध्या पावसाने सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतातील भाजीपाला तसाच पडून आहे. पावसामुळे भाजी काढता येत नसल्यामुळे ती वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. मात्र बुधवारी पावसाने उघडीप दिली आणि भाजी मार्केट मध्ये आवक वाढली. त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात घट झाली आहे.
बीन्स मध्ये कोणतीही घट झाली नाही. बीन्स चा दर ४०० ते ५०० रुपायांपर्यंत आहे. तर टोम्याटोचा दरात घट झाली आहे. पावसाच्या सततच्या माऱ्यामुळे आवक मध्ये घट झाली होती. पण पावसाने उघडीप दिल्यामुळे आवक मध्ये वाढ होऊन दरात घट झाली आहे.