विधानसभा निवडणूक कार्यकाळात बदली झालेले अधिकारी लवकरच मूळ स्थानी रुजू होऊन पदभार स्वीकारणार आहेत मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी ग्रीन सिग्नल दिला आहे. राज्य सरकारच्या डी पी ए आर खात्याने आदेश बजावला आहे.
आचार संहिता काळात बदली झालेले बेळगावं जिल्ह्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली होती.शनिवारी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी बजावलेल्या आदेशानुसार प्रादेशिक आयुक्त म्हणून पी ए मेघन्नावर दोन दिवसात पदभार स्वीकारतील.
बागलकोटचे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून बदली झालेले एम शशिधर कुरेर पुन्हा बेळगाव पालिका आयुक्त बनतील,सुरेश इटनाळ अप्पर डी सी,शकील अहमद बुडा आयुक्त म्हणून पद घेतील.शहर आणि जिल्ह्यातील अनेक पोलीस स्थानकाचे निरीक्षक आणि अधिकारी देखील मंत्री मंडळाचा शपथविधी झाल्यावर म्हणजेच 6 जून नंतर लवकरच आपापल्या जागेवर रुजू होतील अशी माहिती उपलब्ध झाली आहे.