Saturday, April 27, 2024

/

पर्यावरण पूरक वाढदिवस..

 belgaum

आपल्या वाढ दिवसाच्या निमित्ताने देवदर्शन,मित्र परिवाराला जेवण पार्टी देणे आणि सामाजिक क्षेत्रात गरजूंना मदत देणे अशी कार्ये अनेक जण करत असतात मात्र हे सगळ करत असताना आजच्या ग्लोबल वार्मिंगच्या युगात सामाजिक संदेश देण्याचा हेतू ठेऊन वाढ दिवस साजरा करणारे लोक खूप कमी आहेत.

environment birthday

वडगाव येथील पटवर्धन ले आउट मध्ये राहणारे मराठा जागृती निर्माण संघाचे अध्यक्ष गोपाळराव बिर्जे यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक संदेश दिला आहे. त्यांनी आपल्या शेतात याच दिवशी ६८ झाडे लावून पर्यावरण साठी पूरक कार्य केल आहे. आपल्या वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांनी जन्मदिनी ६८ झाडे लावली आहेत.

 belgaum

मराठा समाज उन्नतीच्या हितार्थ अनेक समाजकार्य करणारे गोपाळ राव यांनी झाडे लावा झाडे जगवा हा संदेश आपल्या जन्मदिनी दिला आहे. यावेळी माजी नगरसेवक नेताजी जाधव,सार्वजनिक वाचनालयाचेअनंत लाड,एन ए कित्तूर,वसंतराव कंग्राळकर,प्रा, विद्या टोपीनकट्टी आदि महिला उपस्थित होत्या. जर प्रत्येकाने आपल्या जन्म दिनाच्या निमित्ताने एक झाड लावून एक जगवलं तर बिर्जे यांचा उद्देश्य नक्कीच साध्य होईल.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.