शुक्रवारी दुपारी शहर आणि परिसरात झालेल्या वळीव पावसाने वीज पडून एकीकडे कोर्ट कंपाउंड मधले रेणुका हॉटेल समोरील भिंत कोसळली,अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली असताना दुसरीकडे कडे शहरातील मध्यवर्ती भागातील दुकाने आणि घरात पाणी घुसलं आहे.
शहरातील मोतीलाल चौक,पांगुळ गल्ली आणि भेंडी बाजार भोई गल्लीतील घरातून पाणी घुसलं आहे. मोतीलाल चौकात नुकताच करण्यात आलेला रस्ता आणि गटारकाम उंच करण्यात आल्याने खोलवर असलेल्या घरातून आणि दुकांनात पाणी घुसले आहे याला पालिका जबाबदार आहे असा आरोप या भागातील नागरिकांनी केला आहे.
गेली कित्येक वर्ष इतका पाऊस पडल तरी या भागात कधी घरातून पाणी घुसले नव्हत इतके पाणी या भागातील घरे आणि दुकानातून शिरले आहे त्यामुळे हा भाग पाणी मय झाला होता त्यामुळे महा पालिका प्रशासनाने याकडे लक्ष ध्यावे अशी मागणी देखील केली जात आहे.