गावात दारू बंदी असताना महिले कडून दारू विक्री होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थाकडून महिलेला मारहाण त्यांनतर पोलीस आणि ग्रामस्थात झालेला संघर्ष पोलिसांच्या वाहनावर दगडफेक अन पोलिसांनी केलेला लाठी हल्ला सोमवारी रात्री या सर्व प्रकारा नंतर बेळवटटी(तालुका बेळगाव) गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
ग्रामस्थां कडून मिळालेल्या माहिती नुसार गावातील दारू विक्रेत्याचे घरचे काम त्याच गावातील एक युवक करत आहे त्याचे लग्न असल्याने गेले १५ दिवस याने काम बंद केले होते त्यामुळे बांधकाम करण्यासाठी आगाऊ रक्कम घेतली असा आरोप करत सदर दारू विक्रेत्याने युवकावर पोलीसा करावी दबाव आणण्याला सुरुवात केली होती त्यातून ग्रामस्थ आणि दारू विक्रेते पोलिसात संघर्ष झाला असल्याची माहिती मिळाली आहे.
ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार रेश्मा आप्टेकर वय ३५ या महिलेवर दारू विक्रीचा आरोप करत युवकांनी धिंड काढून मारहाण केली त्यामुळे बंदोबस्तास गेलेल्या पोलीस्नाच्य गाडीवर देखील दगडफेक करण्यात आली होती. या प्रकरणी रेश्मा आप्टेकर यांना उपचारा साठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर गावातील १५० हून अधिक युवकावर पोलिसावर हल्ला करणे महिलेवर हल्ला करणे असे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. सध्या गावात तणावाचे वातावरण असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दरम्यान अटक होईल या भीतीने गावातील अनेक युवक गाव सोडले आहे ग्रामस्थात भीतीचे वातावरण पसरले आहे.