बेळगाव येथील सांबरा विमानतळावर सुविधा अनेक आहेत. विस्तार मोठा झालाय. भलेमोठे अगडबंब विमानतळ बांधण्यासाठी शेतकऱ्यांची जमीन घेण्यात आली. आणि फक्त एकच विमान तेथे मिळत आहे. बेळगावचे दोन्ही खासदार आणि केंद्र सरकारने ही परिस्थिती बदलावी लागणार आहे.
या विमानतळावर पाच विमानसेवा होत्या. १४ तारखेपासून त्या बंद झाल्या. पूर्णपणे हुबळी विमानतळावर हलवण्यात आल्या आहेत. फक्त अधिकारी आणि राजकीय लोकांच्या सोयीसाठी बंगळूर चे एकच विमान शिल्लक आहे.
मुंबई, हैद्राबाद आणि चेन्नई ची विमानसेवा बंद झाली आहे. भलेमोठे म्हणजे 8हजार चौरस फूट इमारत असलेले उत्तर कर्नाटकातील मोठे विमानतळ आणि एकच विमान हे वातावरण आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.