Saturday, May 4, 2024

/

जिल्ह्यात भाजपला  दहा तर कॉंग्रेसला ८ जागा

 belgaum

कर्नाटक राज्यात सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळगाव जिल्ह्यात भाजपाने एकूण १८ पैकी दहा जागा मिळवत मुसंडी मारली असली तरी कॉंग्रेसला देखील आठ जागा मिळाल्या आहेत. मागील २०१३ च्या निवडणुकीच्या तुलनेत कॉंग्रेसला दोन जागांचा फायदा तर एकीकरण समितीला दोन जागांचे नुकसान झाले आहे भाजपच्या मागील निवडणुकी एवढ्या जागाच यावेळी देखील निवडून आल्या आहेत.

पुन्हा तिन्ही बंधू दुसऱ्यांदा विधान सभेत

बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व असलेले तिन्ही जारकीहोळीबंधू सलग दुसऱ्या वेळी विधान सभेत प्रवेश करणार आहेत.गोकाक मधून पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी भाजपच्या अशोक पुजारी यांचा दहा हजर मतांच्या अंतराने पराभव केला तर यमकनमर्डीतून माजी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केवळ ५ हजार मतांच्या अंतरानी भाजपच्या मारुती अष्टगी यांच्यावर निसटता विजय मिळवला. अरभावी तून भाजपच्या तिकिटावर भालचंद्र जारकीहोळी यांनी मोठ्या फरकाने कॉंग्रेसच्या अरविंद दलवाई यांचा पराभव केला.

 belgaum

रमेश जारकीहोळी हे गोकाक मधून सतत पाचव्यांदा आमदार झाले आहेत यमकनमर्डी तून सतीश जारकीहोळी हे तिसऱ्यांदा विधान सभेवर जात असून ते दोनदा विधान परिषद सदस्य देखील होते त्यांची पाचवी टर्म आहे.अरभावी मधून भाजपच्या तिकिटावर तिसऱ्यांदा भालचंद्र जारकीहोळी निवडून आलेत या अगोदर ते दोनदा निधर्मी जनता दलचे आमदार होते ते देखील पाचवी वेळ आमदार झाले आहेत. या तिन्ही जारकीहोळी बंधूंच्या विजया मुळे पुन्हा एकदा बेळगाव जिल्ह्यावर जारकीहोळी बंधुंचेच वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.

पत्नी विजयी तर पती पराभूत

जिल्ह्यात निपाणी तून भाजपच्या तिकिटावर शशिकला जोल्ले या दुसऱ्यांदा आमदार झाल्या आहेत तर त्यांचे पती अण्णासाहेब जोल्ले यांना चिकोडी सदलगा मतदार संघातून हार पत्करावी लागली आहे. चिकोडी सदलगा येथून गणेश हुक्केरी यांनी पराभव केला तर निप्पानीतून शशिकला जोल्ले यांनी कॉंग्रेसचे माजी आमदार  काकासाहेब पाटील यांचा पराभव केला.

भाजपचे माजी मंत्री पराभूत

अथणी येथून गेले तीन निवडणुका जिंकेलेल भाजपचे माजी मंत्री लक्ष्मण सवडी यांना पराभवाचा धक्का बसला आहे कॉंग्रेसच्या महेश कुठ्मळळी यांनी त्यांचा पराभव केला आहे. डी सी सी बँकेच्या राजकारणातून त्यांचा पराभव झाला स्ल्यची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. रामदुर्ग विध्यमान आमदार सिद्धरामय्या सरकारचे मुख्य सचेत अशोक पट्टण यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला आहे अटीतटीच्या लढतीत भाजपचे महादेवाप्पा यादवाड यांनी त्यांचा पराभव केला. कागवाड मधून भाजपचे राजू कागे यांना कॉंग्रेसच्या श्रीमंत पाटील यांना हरवलं तर कुडची मधून सतत दुसऱ्यांदा पी राजीव आमदार हले आहेत मागील वेळी बी एस आर पक्षातून आमदार झाले होते यावेळी त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे राजीव यांनी माजी आमदार शाम घाटगे यांचे पुत्र शिव घाटगे यांचा पराभव केला.

उमेश कत्ती यांचा विजय

हुक्केरी मतदार संघात कॉंग्रेसचे माजी मंत्री ए बी पाटील यांचा पराभव करत उमेश कत्ती यांनी पुन्हा एकदा विजय संपादन केला. कॉंग्रेस माजी मंत्री डी बी इनामदार यांचा कित्तूर विधानसभा मतदार संघात भाजपच्या महांतेश दोड्डगौडर यांनी पराभव केला. भाजपचे जिल्हा अध्यक्ष डॉ विश्वनाथ कत्ती यांना पराभव सामोरे जावे लागले असून बैलहोंगल या लिंगायत बहुल मतदार संघात कॉंग्रेसचे महांतेश कौजलगी यांनी विजय मिळवला बंडखोर भाजप जगदीश मेटगुड यान दुसऱ्या क्रमांकांची मते मिळाली. सौंदत्ती मतदार संघात सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत भाजपच्या  आनंद मामनी यांनी हटट्रीक केली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.