मराठा लिंगायत धनगर दलित आणि मुस्लिम असे सर्व जाती धर्माचे लोक माझ्या सोबत आहेत. मी कधी देश संरक्षणा साठीची मिलीटरीची जागा हडप केली नाही असा संतप्त सवाल आमदार फिरोज सेठ यांनी करत अप्रत्यक्ष रित्या भाजप नेत्यावर नाव न घेता टीका केली आहे.
मंगळवारी दुपारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सकाळी वायरल झालेल्या व्हीडिओची सत्यता पडताळा सत्य बाहेर येईलच अस स्पष्टीकरण सेठ यांनी दिल आहे.
न्यु गांधीनगर येथील माजी नगरसेवक ‘अजीमभाई जिंदाबाद’ अशी घोषणा दिली असताना देश विरोधी घोषणा दिली असल्याचा भाजप कडून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप देखील त्यांनी केलाय.
भाजपच्या गलिच्छ राजकारणा बद्दल काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांनी टीका केलो आहे भाजप निवडणूक जिंकण्यासाठी काहीही करू शकते कोणत्याही थराला जाऊ शकते असा देखील आरोप करत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.मी कधीही कुणाचे वयक्तिक नुकसान केलेलं नाही वरील देश विरोधी व्हीडिओ आहे असे भासवून वायरल केलेल्या वर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करत यात भाजप नेत्यांचा सहभाग असल्याचा आरोप केला आहे.