गर्लगुंजी गावचा म.ए.समितीचे अधिकृत उमेदवार विलासराव बेळगावर यांना जाहीर एकमुखी पाठींबा व्यक्त करण्यात आला. यावेळी माजी आमदाराचा निषेध करून अरविंद पाटलानी परवा झालेल्या त्यांच्या सभेत आम्हांला जबरदस्ती व्यासपीठावर बोलावून नेऊन गावचा पाठींबा आहे असे बोला म्हणून सांगितले होते पण तसं नसून आमचा गर्लगुंजी गावचा संपूर्ण पाठींबा हा विलासराव बेळगावकरनाच आहे आणि तो राहणार अशी शपथ हजारो मतदार बंधु भगिनीनी यावेळी घेतली.
बेळगावकर यांचा विजय हा झालेला आहे फक्त किती मताधिक्यानी येणार एवढंच बाकी आहे अशी भावना गर्लगुंजी गावातून प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी चार हजार हुन अधिक मराठी भाषिकांनी हजेरी लावली होती.मुंबई मराठी अभ्यास केंद्राचे प्रमुख दीपक पवार यांच्या सह दिगगजानी यावेळी हजेरी लावली होती.