टायगर जिंदा है…टायगर इज बॅक असे म्हणत या विधानसभा निवडणुकीत एन्ट्री घेतलेल्या वाघाने मोठी झेप घेतली असून दक्षिण मतदार संघात माजी महापौर किरण सायनाक यांना संपूर्ण पाठिंबा दिला आहे तर उत्तर मतदार संघात निवडणूक रिंगणातून माघार घेऊन समितीचे एकमेव अधिकृत उमेदवार बाळासाहेब काकतकर यांच्या पाठिशी रहाणार असल्याचं जाहीर केलं आहे.
सोमवारी सायंकाळी लोकमान्य संस्थेच्या कार्यालयात दक्षिण भागातले सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत आमदार संभाजी पाटील यांनी किरण सायनाक आणि बाळासाहेब काकतकर यांना निवडून आणण्याचा वज्र निर्धार व्यक्त केला.उध्या पासून दक्षिण आणि उत्तर या दोन्ही मतदार संघात आमदार संभाजी पाटील सक्रिय रित्या फिरून प्रचार करणार आहेत आमदारांच्या या भूमिकेमुळ दोन्ही उमेदवाराना हत्तीचं बळ मिळालं असून त्यांची ताकत वाढली आहे.मराठी भाषिक समितीच्या भल्यासाठी आमदार संभाजी पाटील यांनी हा निर्णय घेतला असल्याचं स्पष्ट केलं आहे.
आमदार संभाजी पाटील आपल्या नगरसेवकांच्या ताफ्यासह उत्तरेत समितीचा तर दक्षिणेतून किरण सायनाक यांचा प्रचार करणार आहेत. स्वता कडे एक वेगळी छाप तळा गाळातील समाजाची हजारो मतांची वोट बँक आमदारांच्या कडे आहे त्या शिवाय त्यांना मानणारा एक वेगळा असा मोठा वर्ग मराठी समाजात आहे आमदारांच्या या भूमिकेनंतर दक्षिण मतदार संघातील गणित नक्कीच बदलणार आहेत.