योगदान
१. बेळगावच्या जिल्हा हॉस्पिटल मध्ये डायलिसिस मशीन बसवली जावी या मागणीसाठी आंदोलन केले. यामुळे ही मशीन बसवली जाऊन गोर गरीब जनतेची मदत झाली.
२. तुरमुरी कचरा डेपो मुळे तुरमुरी आणि परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांच्या विरोधात तीव्र आंदोलन पुकारले, यामुळे परिसरातील ग्रामपंचायतींना फॉगिंग मशीन आणि आवश्यक औषधे पुरवण्यात आली.
३.आरटीओ खात्यातील गैरकारभार आणि एजंटराज विरोधात प्रखर आंदोलन करून त्यावर आवाज उठवला.
४.बेळगाव शहरातील प्रमुख सरदार मैदान खासगी कार्यक्रमांना देणे बंद करून ते फक्त क्रीडा उपक्रमांना द्यावे या मागणीसाठी आंदोलन केले, आज तर ते फक्त खेळासाठी दिले जाते. याचे श्रेय महेश कुगजी यांना जाते.
५.कमी दर्जाचा माध्यान्ह आहार देऊन लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आणले जात होते, यावर आंदोलन करून आहार तयार करणाऱ्या संघांना काम सुधारण्यास भाग पाडले.
६.जुने रेल्वे ओव्हर ब्रिज आणि गोगटे सर्कल येथील रस्त्यावर खड्डे पडले होते. प्रशासनाला निवेदने देऊनही खड्डे भरले नाहीत, अपघात रोजच घडत होते. अनर्थ टाळण्यासाठी स्वतः डांबर आणि काँक्रेट आणून रोलर वापरून रस्ता केला.
७.अनगोळ च्या झटपट कॉलनी येथील मराठी शाळेचा मुद्दा उपस्थित करून शिक्षण खात्याला जागे केले तर नानावाडी येथील मराठी शाळेला जागा मिळवून देऊन गरीब विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला.
८.खानापूर रोडवर तिसऱ्या गेट जवळ डीवायडर फोडून राजकीय नेत्याची सोय केली होती आणि अपघात होत होते. निवेदन देऊनही काम न केल्यामुळे स्वतःच हा डीवायडर बांधून घेतला.
९.शहरातील एकही सार्वजनिक स्वच्छता गृह आणि मुताऱ्या धुतल्या जात नव्हत्या, आरोग्याला धोका नको म्हणून त्या स्वतः कार्यकर्त्यांबरोबर धूऊन काढल्या. सरकारी अधिकाऱ्यांचे डोळे उघडण्यात आले.
१०.अवजड वाहने शहरातून केंव्हाही फिरून अपघात होत होते आणि रहदारी समस्या होत होती. आंदोलन करून सकाळी ६ ते रात्री ६ पर्यंत अवघड वाहनांचा शहरातील प्रवेश बंद करून घेतला.
११.किल्ल्यासमोरील अशोक स्तंभ विकासाच्या नावाखाली हटवण्यात आला होता. तो पुन्हा उभारणीसाठी आवाज उठवला.
१२.स्वच्छ शहर राखण्यासाठी वैद्यकीय कचऱ्याचा मुद्दा लावून धरण्यात आला.
१३.शहर परिसरात हेल्मेट सक्ती विरोधात आंदोलन केले.
१. स्वच्छ पाणी, चांगले रस्ते आणि नियमित वीज हा हक्क आहे. प्रत्येक सरकारने तो दिलाच पाहिजे. हा हक्क कधीच डावलला जाणार नाही याची काळजी घेणार.
२.आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी ताई यांना योग्य मानधन आणि सोयी सुविधा मिळवून देणार.
३.तलाठी तसेच महसूल खात्याच्या समस्या सोडवून तेथील भ्रष्ट कारभार दूर होण्यासाठी प्रयत्न करणार.
४. प्रत्येक कुटूंबाला रेशन चे धान्य मिळणे हा हक्क आहे. तांदूळ, गहू, डाळ, साखर आणि तेल मिळवून देणार. परस्पर विक्री आणि काळा बाजाराला आळा घालणार.
५. युवापिढी सशक्त होण्यासाठी खेळावर भर देणे गरजेचे आहे. प्रत्येक वॉर्ड आणि ग्रामपंचायत स्तरावर स्पोर्ट संकुल उभारणार.
६. नागरिकांना मोफत आरोग्य सेवा देण्यासाठी प्रत्येक वॉर्ड आणि ग्रामपंचायत स्तरावर सुसज्ज सरकारी क्लिनिक उभारणार.
७.शेतकऱ्यांना मोफत वीज आणि शेतात प्रवास करण्यासाठी रस्ते मिळतील. कमी दरात पीक कर्ज व कर्जमाफी साठी सरकार कडे प्रयत्न करणार.
८.महिलांना स्वयं रोजगार आणि बचत गटाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी योजना देणार.
९.गोर गरीब, अपंग आणि गरजूंना स्वतःच्या पायावर उभे करणार.