14 एप्रिल 1944 रोजी मुंबई डॉक यार्ड वर फोर्टस्टीकेन या युद्धाचे साहित्य आणि उपकरण मालवाहू जहाज मध्ये लागलेल्या आग विझवताना 66 अग्निशामक दलाच्या जवानांना हुतात्म्य पत्कराव लागलं होतं या जवानांच्या आठवणीत दरवर्षी 14 एप्रिल रोजी अग्निशामक दिनाचे आयोजन करण्यात येतंय.
शनिवारी सकाळी बेळगावातील फायर ब्रिगेड कार्यालयात अग्निशामक दिन पाळण्यात आला यावेळी जवानांनी हुतात्म्यांना अभिवादन केले.बेळगाव अग्निशामक दलाचे प्रभारी अधिकारी विनायक हट्टेकर यांनी हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.यावेळी अग्निशामक दलाच्या जवानांनी संचलन देखील केलं.