घरपट्टी भरून घेण्यास निवडणुकीचे कारण दाखवून टाळाटाळ केली जात आहे. नागरिकांना उगाच फेऱ्या माराव्या लागत आहेत, यामुळे नागरिकांनी सरळ निवडणूक झाल्यावरच मनपाने घरपट्टी भरून घ्यावी अशी मागणी केली आहे.
मनपामध्ये चलन भरून देण्यास टाळाटाळ केली जात आहे. चलन देणारे लोक निवडणुकीचे काम आहे असे सांगून फेऱ्या मारायला लावत आहेत, चलन मिळालेच तर घरपट्टी भरून घेणारी केंद्रे आज नाही उद्या, उद्या नाही परवा अशी उत्तरे देत आहेत, यासाठी निवडणूक झाल्यावरच घरपट्टी भरून घ्या पण कोणताही दंड घेऊ नका, अशी त्रस्थ नागरिकांची मागणी आहे.