भाजप पक्षाने बेळगाव उत्तर मतदारसंघात लिंगायत व्यक्तीस उमेदवारी द्यावी अशी मागणी जोर धरत आहे, ही मागणी मान्य होणार का? याकडे या समाजाचे लक्ष आहे.
मराठा, मुस्लिम, लिंगायत आणि इतर धर्मीय असा हा संमिश्र मतदारसंघात लिंगायतांनी भाजपला आव्हान दिले आहे. मराठी आणि हिंदूंची मते मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या पक्षासमोर यामुळे प्रश्नचिन्ह आहे. लिंगायत दिल्यास मराठा उमेदवार व मतदार नाराज होऊन इतर पक्षाकडे वळण्याची शक्यता असून मराठा उमेदवार दिल्यास लिंगायत व कन्नड भाषिक मते दुसऱ्या पक्षास पडण्याचा धोका जास्त आहे,
यामुळे भाजप समोर यक्षप्रश्न निर्माण झाला आहे.
भाजप कडून यावेळीही धातुरा मिळण्याची शक्यता असल्याने काही मराठा उमेदवार समितीच्या संपर्कात असल्याची माहितीही मिळत आहे, त्यांना समिती आपलेसे करणार काय हे स्पष्ट नाही, पण उत्तरेत उमेदवार निवडताना भाजप सारख्या राष्ट्रीय पक्षाचीही कसोटी लागणार आहे.
Trending Now