थोड्या कालावधीसाठी पचनसंस्थेत बिघाड झाल्यास त्याला अजीर्ण म्हणतात तर बर्याच कालावधीसाठी पचन क्षमता कमी झाल्यास त्याला अग्निमांद्य म्हणतात. खाण्यात रूची नसल्या किंवा चत बिघडल्यास अरूची म्हणतात. थोड्याबहुत फरकाने हे प्रकार तसे सारखेच दिसले तरी कारणे व उपचार मात्र वेगळे आहेत.अजीर्ण का होते?
1. अती प्रमाणात सारखे खाणे, जडान्न- शिळेपाके खाणे.
2. आवडणारे पदाथ्र अतिप्रमाणात तडस लागेपर्यंत खाणे किंवा न आवडणारे पदार्थ कंटाळत नाईलाजास्तव खाणे.
3. दातांअभावी अथवा घाईमुळे न चावता भरभर खाणे.
4. भूक नसताना खाणे, रात्री खूप उशिरा किंवा सकाळी अगदी लवकर खूप अथवा पूर्णान्न घेणे.
5. जेवताना अति पाणी पिणे.
6. वेळ घालवण्यासाठी (टाईमपास) मेवामेठाई, जंकफूड घेणे.
7. चहा, मद्य, सुपारी, तंबाखू यांचे सेवन केल्यामुळे अजीर्ण होऊ शकते.
अरूची का होते?
अतिविचार, भय- शोकाचा अतिरेक, तापानंतर काही दिवस अरूची जाणवते. मानसिक ताणामुळे अरूची होते. अजीर्ण व अग्नीमांद्य यामुळेही अरूची होते.
अजीर्ण व अरूची यांची लक्षणे
पोटफुगी, करपट ढेकर, घशात जळजळणे, अन्नावरील आसक्त्ती नष्ट होणे, पोटदुखी, अस्वच्छता, मळमळ, मुखदर्गंधी, मलदुर्गंधी, वायुदुर्गंधी, शौचास अर्धवट, साफ न होणे किंवा पोट एकदम झाडणे (जुलाब होणे), क्वचित उलटी होणे (न पचलेले अन्न बाहेर पडणे)
उपचार
दिवसभर भरपूर पाणी प्यावे. परंतु जेवताना मधेमधे पाणी पिऊ नये. सुमारे दोन दिवस लंघन, उपवास, शुध्दी आहार, फलाहार, नैसर्गिक आहार, उकडलेला आहार अशा पध्दतीने मर्यादित आहारक्रम ठेवावा. वामकुक्षी, शतपावली यांचा अवलंब करावा.
निसर्गोपचार- सैंधव एक ग्रॅम, आले व कांद्याचा समभाग रस, हिंग व ओवा समभाग एकत्रित करून दिवसातून हे मिश्रण किमान दोन वेळा घ्यावे. अननसाचा अजीर्णावर चांगला उपयोग होतो. अननसावर साखर किंवा मीठ टाकून किमान दोन वेळा घ्यावे. पपईसुध्दा पाचक आहे. जेवणानंतर पपईमधील पॅपिन या संप्रेरकामुळे पचन होते.
बडीशेप, लिंबू, ओवा, पादेलोण जेवणापूर्वी अर्धातास गरम पाण्यासह घ्यावे.
हिंग, ओवा, लिंबूरस आधि शेवगारस घ्यावा, ढेकर जळजळ अस्वस्थता कमी होते.
बाराक्षार-
लक्षणानुसार मॅगफास 6 नेट्रममूर6, कालीमुर 3, नेट्रमसल्फ 3, फेरमफॉस 12 देता येतात.
अॅक्युप्रेशर- हनुवटीच्या मधोमध असलेला बिंदु सुमारे दोन मिनीटे दाबावा. तसेच पायाच्या घोट्याच्या सांध्यासमोरील मध्यरेषेवर असणार्या बिंदूवर अंगठ्याने दोन दोन मिनिटे दाब द्यावा.
होमिओपॅथी- अति प्रमाणात अजीर्ण, जुलाब, उलटी, पोटदुखी झाल्यास लक्षणांप्रमाणेच अँन्टीमोनियम क्रूड, कॅलकेरिया कार्ब, पेल्सेटिला ही औषधे देता येतात. अरूचीसाठी पेप्सिन 3 हे औषध वापरतायेते. खाण्याच्या वाईट सवईमुळे इनडायजेशन झाल्यास नक्सवोमिका औषध उपयुक्त आहे. चहा जास्त घेतल्याने अजीर्ण झाल्यास थूजा, गॅस पास झाल्यास बरे वाटत असल्यास कार्बोवेज, खूप चिडल्यामुळे अजीर्णाचा त्रास झाल्यास कोलोसिंथ, अतीगोड खाऊन अजीर्ण झाल्यास अर्जेंटम नायट्रीकम, टेन्शनमुळे, काळजीमुळे अजीर्ण झाल्यास जेल्सेमियम ही औषधे वापरता येतात.
होमिओपॅथी हे एक परिपूर्ण उपचारशास्त्र आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या तक्रारी व लक्षणे यासाठी औषधे नाही असे नाही तर सर्वच व्याधींवर उत्कृष्ट उपचार शक्य आहेत. त्याकरिता तज्ज्ञााांची मदत घ्यावी. अन्यथा उत्कृष्ट उपचार जाणीवेअभावी फोल ठरण्याची शक्यता असते.
संपर्क
डॉ सोनाली सरनोबत
केदार क्लिनिक – ९९१६१०६८९६
सरनोबत क्लिनिक- ९९६४९४६९१८