उत्तर कर्नाटकच्या दौऱ्यावर आलेल्या निधर्मी जनता दलाचे नेते माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांनी बेळगाव कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्न हा संपलेला विषय आहे असे वक्तव्य करत मराठी जनतेच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला आहे.
सोमवारी बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी वरील विषय मांडला. कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्न सुप्रीम कोर्टात प्रलंबित असताना हा संपलेला विषय आहे असे वक्तव्य केल आहे.
आगामी निवडणुकीत जनता दलास मायावती शरद पवार आणि ममता बनर्जी यांचे सहकार्य लाभणार असून लिंगायत वेगळा धर्म मान्यता या विषयात जे डीएस पडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सतीश जारकीहोळी यांनी य अगोदर जनता दलात काम केलंय दोघे भाऊ कॉंग्रेस मध्ये आहेत त्यांच्यात का वाद आहे मला माहित नाही पण सतीश जारकीहोळी जर का जनता दलात यायला उत्सुक असतील तर त्याचं स्वागत आहे असे ते म्हणाले.
बेळगाव जिल्ह्यात जनता दल बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार असून बागलकोट विजापूर गदग सह उतर कर्नाटकात यावेळी होणाऱ्या निवडणुकीत जनता दलाचे चांगले यश मिळेल असा दावा देखील त्यांनी केला. मी पंत प्रधान मुख्यमंत्री आणि जल संपदा मंत्री म्हणून अनेक चांगली कामे केली आहेत त्याचा फायदा या निवडणुकीत आम्हाला मिळेल या शिवाय शरद पवार मायावती आणि ममता बनर्जी याची देखील मदत होईल असे त्यांनी नमूद करत आमचेच सरकार सत्तेत येईल अस म्हणाले. यावेळी शिवन गौडा पाटील, गिरीश गोकाक,फैजुल्ला माडीवाले आदि उपस्थित होते.