समुद्रात १.९ किमी पोहणे, ९० किमी सायकल चालवणे आणि २१ किमी धावणे हे एकामागोमाग पूर्ण करण्याचे आव्हान बेळगावच्या मयुरा शिवलकर हीने ७ तास २५ मिनिटांच्या कालावधीत पूर्ण केले.
श्रीलंकेच्या कोलम्बो शहरात झालेल्या या एकूण ७०.३ किमीच्या आयर्नमन आव्हानात्मक स्पर्धेत आठवी आली आहे.
मयुरा ने मागील काही महिन्यांपासून स्वतःला तयार केले होते. इतक्या मोठ्या आव्हानात्मक स्पर्धेत भाग घेऊन ते आव्हान पूर्ण करत बेळगाव शहराची मान उंचावली आहे.