बेळगावच्या एक तरुणास अबुधाबी येथे अटक करण्यात आली आहे. त्याची सुटका करा अशी मागणी त्याच्या पालकांनी ट्विटरवरून परराष्ट्र खात्याच्या मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे केली आहे.
आनंद कामकर असे त्या तरुणाचे नाव आहे. तो वडगाव चा आहे. ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता त्याला शाबिया पोलीस स्थानकात अटक करण्यात आले आहे. भारतीय दुतावासाच्या कार्यालयाजवळ बेकायदेशीरपणे फोटो काढणे हा त्याचा गुन्हा आहे.
मॅडम माझा मुलगा आनंद हा ३२ वर्षांचा असून तो ओयो स्टेज प्रायवेट लिमिटेड च्या माध्यमातून अबुधाबी येथे पॅकेज टूर वर गेला होता. बंदी असलेल्या ठिकाणी त्याने फोटो काढले, यामुळे त्याला अटक झाली असून त्याची सुटका करून आम्हाला मदत करा, अशी विनंती त्याचे वडील पांडुरंग कामकर यांनी सुषमा स्वराज यांना केले आहे.
आता परराष्ट्र खाते आणि स्वतः मंत्री स्वराज काय करतात याकडे बेळगावकरांचे लक्ष लागले आहे.