सोमवारी दुपारी आर टी ओ सर्कल जवळ ट्रकने चिरडल्याने झालेल्या अपघातात टोपी गल्ली येथील इनायत बशीर अहमद शेख याच्या अपघाती मृत्यूचे पडसाद पालिका बैठकीत पहावयास मिळाले.विद्युत वाहिन्या खुदाई केलेल्या हेस्कॉमच्या कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा निर्धार बैठकीत घेण्यात आला.
सोमवारी दुपारी हेस्कॉम ने विद्युत वाहिन्या साठी काढलेल्या खड्डयामुळे त्याच्या मृत्यु झाला असून यास हेस्कॉम जबाबदार असल्याचा आरोप नगरसेविका मीनाक्षी चिगरे यांनी उपस्थित केला तर दुचाकी वरून खड्डा चुकवताना गाडी स्लीप झाल्याने अपघातात या खड्डया मुळेच हा अपघात झाला असून इनायत पश्चात त्याची आई परिवारास मानसिक धक्का बसला आहे एच टी लाईन कंपनीवर गुन्हा नोंद करावा अशी मागणी नगरसेवक मतीन शेख यांनी केली. खड्डा बुझवण्याची अनेकदा विनंती करून देखील हेस्कॉम ने दुर्लक्ष केले आशयाचा आरोप करत महापौरांनी या खड्ड्याची पाहणी करावी आणि हेस्कॉम कडून दंड वसूल करावा अशी मागणी बाबूलाल मुजावर यांनी केली.
इनायत मृत्यु प्रकरणी नगर विकास खात्याला अहवाल पाठवून कंपनीवर गुन्हा नोंद करा आणि मृतकाच्या वारसास नुकसान भरपाई साठी पालिकेच्या वतीने प्रयत्न कराव असा आदेश महापौर संज्योत बांदेकर यांनी दिला.
सत्ताधारी नगरसेवक आमदारात वादावादी
विद्युत वाहिन्या कामामुळे रस्त्यांची झालेल्या खुदाईत पालिकेत रस्ते खराब झाल आहेत त्याची भरपाई हेस्कॉम ठेकेदारा कडून वसूल करा अशी मागणी सत्ताधारी नगरसेवक किरण सायनाक आणि पंढरी परब यांनी केली त्यावेळी आमदार फिरोज सेठ यांनी हेस्कॉम कडून दंड वसूल करा आणि शहरातील जाहिरात कर वाढवा महसूल वाढवा अशी मागणी केली यावेळी सत्ताधारी नगरसेवकांनी जाहीर कर वाढवण्याचावेगळा विषय आहे त्यावर नंतर चर्चा करू असे म्हणताच आमदार नगर सेवकात वादावादी झाली. एच टी लाईन खड्डे मुळे शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाल्याचा आरोप बहुतेक नगरसेवकांनी बैठकीत केला.
सुरुवातीला महाराष्ट्र एकीकरण समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते दौलतराज गोडसे आणि स्वच्छता निरीक्षक विलास देवरवाडी यांना मौन पाळून सभागृहात श्रद्धांजली वहाण्यात आली.