आज दुपारी साडेतीन च्या दरम्यान संगोळ्ळी रायन्ना सर्कल येथे 20 वर्षीय मेकॅनिक युवक ट्रक च्या धडकेत ठार झाला. यानंतर संतप्त जमावाने ट्रक जाळून आपला संताप व्यक्त केला आहे.
इनायत बशीरअहमद शेख असे त्या मयत युुवकांच नाव असून तो खंजर गल्ली येथील असल्याची माहिती बेळगाव live च्या हाती आली आहे.
अपघात घडला तेंव्हा नागरिकांचा संताप अनावर झाला यामुळे ट्रक जाळून टाकण्यात आला आहे. अग्निशामक दलाला बोलावून घेऊन आग आटोक्यात आणण्यात आली आहे.