बेळगावमध्ये जाऊन कर्नाटकचे गोडवे गायल्याने महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर सर्वस्तरातून टीका होते आहे. ‘जन्मावे तर कर्नाटकमध्येच’ हे कन्नड अभिमान गीत गायल्याने चंद्रकांत पाटील यांच्यावर सोशल मीडियाबरोबरचं राजकीय नेत्यांकडूनही टीका होऊ लागली आहे.
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली. तसंच त्यांनी चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला.नांदेड दौऱ्यावर असतेवेळी त्यांनी ही मागणी केली आहे
अजित दादांनी अश्या शब्दात पाटलांचा निषेध केलाय.
कर्नाटक राज्यात मराठी भाषिक लोकांना वाईट वागणूक मिळते. महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादांनी यांनी बेळगाव जिल्ह्यातील एका कार्यक्रमात कन्नडमध्ये गीत गाणे अयोग्य आहे. त्यांच्या अशा वागण्याचा धिक्कार. त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा.