भाजपचे खासदार सुरेश अंगडी यांनी येळ्ळूर रस्ता दुरुस्ती कामास येळ्ळूर पंचायतीच्या सदस्यांना डावलून आमंत्रण न देताच रस्ता दुरुस्ती काम सुरु केला असल्याचा आरोप पंचायत सदस्य राजू पावले यांनी केला आहे.
वडगाव ते येळ्ळूर ५ की मी लांबीच्या रस्ता दुरुस्त करण्यास दोन कोटी सत्तर लाख रुपये निधी केंद्रीय रस्ते मंत्रालायालाने मंजूर केला आहे. या कामाचं उद्घाटन घाई गडबडीत उरकण्यात आलं आहे. येळ्ळूर ग्रामपंचायत विश्वासात न घेताच खासदारांनी हे काम सुरु केला असल्याचा आरोप राजू पावले यांनी केला आहे.
माजी आमदारास श्रेय मिळावं या उद्देश्याने खासदारांनी हे उद्घाटन काम उरकलं असल्याचं देखील पावले म्हणाले .