Sunday, April 28, 2024

/

दिल्लीच्या सनी जॉनने मारले कंग्राळीचे कुस्ती मैदान

 belgaum

दिलीच्या सनी जॉन ने कर्नाटक केसरी कार्तिक काटेला ३५ व्या मिनिटाला आसमान दाखवत चीतपट केले आणि कंग्राळी येथील कुस्ती मैदान मारले. बाल हनुमान कुस्तीगीर संघटनेच्या वतीने खास मकर संक्राती निमित्य कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. दुसऱ्या क्रमांकांच्या कुस्तीत इचलकरंजीच्या शुभम सिदनाळे याने कोल्हापूर च्या सरदार सावंतला कडव्या झुंजनंतर ३५ व्या मिनिटाला चितपट केले.

kangrali kusti

पहिल्या क्रमांकाची कुस्ती माजी आमदार मनोहर किणेकर, आयोजक सी एम पाटील,आर आय पाटील,वकील सुधीर चव्हाण,संजय मोरे,वकील शाम पाटील,मोनेश्वर पाटील चेतक कांबळे यांच्या हस्ते लावण्यात आली. रात्री साडे ८ वाजता ही कुस्ती लावण्यात आली होती. हजारो प्रेक्षक यावेळी उपस्थित होते. यावेळी आयोजकांच्या वतीने पत्रकार मल्लिकार्जुन मुगळी, प्रसाद प्रभू तर शिव संत उपाधी मिळवलेले संजय मोरे यांचा सत्कार करण्यात आला.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.