Sunday, December 22, 2024

/

येळ्ळूरवासीयांना यल्लम्मा डोंगरावर ६ एकर जागा मिळाल्याने पोटशूळ

 belgaum

दरवर्षी जत्रेला तसेच इतर कार्यक्रमांना सौन्दत्ती यल्लम्मा डोंगरावर जाणाऱ्या येळ्ळूरवासीयांना तेथे ६ एकर हक्काची जागा मिळाली आहे.
विणकर नेते तसेच भाजपचे विधानसभा दक्षिण मतदारसंघातील प्रभावी उमेदवार पी डी धोत्रे यांनी वारंवार पाठपुरावा करून ही मंजुरी मिळवून घेतली आहे.यामुळे आता काही राजकारणी व्यक्तींना पोटशूळ उठला आहे.
सरकारने भक्तनिवास व इतर सुविधांसाठी १ कोटींची मंजुरी दिली, पुढील काळात एकूण १० कोटींच्या सुविधा कामांची तरतूद करण्यात आली आहे.हे काम स्वतः तर केलेच नाही पण ते केल्याचे श्रेय दुसऱ्या नेत्याकडे जाईल म्हणून आता काहींची डोकी भडकली आहेत, याचा राग सरकारी कर्मचाऱ्यांवर काढला जातोय.
त्यांचे ऐकून तुम्ही काम कशासाठी केला? असा प्रश्न निवडणुकीपूर्वीच हलगी वाजलेल्या एकाने केल्याची माहिती मिळाली आहे तर त्यामागे एक माजी आमदारही आहे. हे काम केल्याने रेणुका भक्तांचा पाठींबा धोत्रे यांना मिळेल अशी भीतीच यातून स्पष्ट होतेय.
सोमवारी येळ्ळूर वासीयांनीं यल्लम्मा डोंगरावर पडल्या भरण्याचा कार्यक्रम ठेवला होता. त्यावेळी शेतकरी नेते नारायण सावंत यांच्यासह दाखल होऊन पी डी धोत्रे यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण केली होती. यामागे आपला कोणताच स्वार्थ नाही, उलट आता आरडा ओरड करणाऱ्यांनी पूर्वी काम करून दाखवले असते तर श्रेय त्यांनाच मिळाले असते अशी प्रामाणिक प्रतिक्रिया त्यांनी मांडली.
आजवर राजकारणी मंडळींनी फक्त आश्वासने दिली, मात्र धोत्रे यांनी कोणत्याही पदांवर नसतानाही येळ्ळूर वासीयांची ही कामे करून दिली आहेत. यल्लम्मा भक्त असणाऱ्या येळ्ळूरवासीयांना आता हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. मात्र चांगले काम झाले याची भावना राजकारणी नी ठेवायला पाहिजे, ते त्यातच खुसपट काढत आहेत.
यामुळे रेणुका भक्तही जास्तच नाराज होतील यात शंका नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.