Monday, May 13, 2024

/

पी डी धोत्रें च्या प्रयत्नातून येळ्ळूरवासीयांना मिळाली यल्लम्मा डोंगरावर ६ एकर जागा

 belgaum

दरवर्षी जत्रेला तसेच इतर कार्यक्रमांना सौन्दत्ती यल्लम्मा डोंगरावर जाणाऱ्या येळ्ळूरवासीयांना तेथे ६ एकर हक्काची जागा मिळाली आहे. तसेच सरकारने भक्तनिवास व इतर सुविधांसाठी १ कोटींची मंजुरी दिली असून पुढील काळात एकूण १० कोटींच्या सुविधा कामांची तरतूद करण्यात आली आहे.
विणकर नेते तसेच भाजपचे विधानसभा दक्षिण मतदारसंघातील प्रभावी उमेदवार पी डी धोत्रे यांनी वारंवार पाठपुरावा करून ही मंजुरी मिळवून घेतली आहे.
सोमवारी येळ्ळूर वासीयांनीं यल्लम्मा डोंगरावर पडल्या भरण्याचा कार्यक्रम ठेवला होता. त्यावेळी शेतकरी नेते नारायण सावंत यांच्यासह दाखल होऊन पी डी धोत्रे यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे.Yallamma
आजवर राजकारणी मंडळींनी फक्त आश्वासने दिली, मात्र धोत्रे यांनी कोणत्याही पदांवर नसतानाही येळ्ळूर वासीयांची ही कामे करून दिली आहेत. यल्लम्मा भक्त असणाऱ्या येळ्ळूरवासीयांना आता हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. असे यावेळी नारायण सावंत यांनी भाषणात सांगितले.
सरकारी १ कोटी निधी मिळण्यासाठी लोकवर्गणीतून १० लाख रुपये जमा करायचे आहेत, यासाठी आवाहन करताच त्याच ठिकाणी २ लाख जमा झाले आहेत. उर्वरित ८ लाख आठवड्याभरात जमवून पुढील कामकाज केले जाणार आहे.
या ६ एकर जागेत भक्तनिवास, भक्तांना राहण्यासाठी खोल्या, हॉल, स्वच्छता गृहे अशी आरामदायक सोय मिळणार आहे, यामुळे पाठपुरावा करणाऱ्या धोत्रे यांच्याबद्दल उपस्थितांनी आभार मानून पुढील काळात अशीच साथ द्या अशी मागणी केली. रेेणूकादेेवी मंदिराचे मुख्य पुजारी शंंकर गौडा यावेळी उपस्थथित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.