Monday, April 29, 2024

/

संवेदनशील भागातील समाज कंटक होणार कॅमेऱ्यात कैद

 belgaum

उत्तर भागातील अति संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खडक गल्ली जालगार गल्ली भागात उंच हायमास्ट लाइट हाय डेफिनेशन सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याट येत आहेत.यामुळे या भागात दगडफेक करणारे समाजकंटक कॅमेऱ्यात कैद होणार आहेत.

गेले कित्येक दिवस या भागात दगडफेक जाळपोळीच्या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण होत आहे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी या भागात चार उंच हायमास्ट आणि त्यावर हाय डेफिनेशन सी सी टी व्ही कॅमेरे बसवायला सुरुवात केली आहे. शनिवारी सायंकाळी जालगार गल्ली आणि खडक गल्ली दोन हायमास्ट चे खड्डे काढून बसवण्यात आले आहेत. या अगोदर इलेक्ट्रीकल आणि फोन खांब वर असलेले सी सी टी व्ही कॅमेरे फोडून दगडफेक करण्यात येत होती त्यामुळे अनेकदा समाज कंटक कॅमेऱ्यात कैद होत नव्हते मात्र नवीन उंच हायमास्ट मुळे समाज कंटकांच्या हालचालीवर पोलिसांना नजर ठेवता येणार आहे.haay mast cctv

सुमारे दोन लाख रुपये किंमतीचे, अंदाजे एक किलो मीटर रेंज जाईल असे, ९० डिग्री फिरणारे, हाय डेफिनेशनचे कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. रहदारी नियंत्रणात बसवलेल्या कॅमेऱ्यां प्रमाणेच चार ठिकाणी हे कॅमेरे बसवले जाणार असून उंचावरून सभोतालच्या परिसरावर नियंत्रण कक्षातून नजर ठेवता येणार आहे अशी माहिती डी सी पी अमरनाथ रेड्डी यांनी बेळगाव live कडे दिली आहे.जालगार गल्ली कॉर्नर ( हॉटेल छाया दर्शिनी जवळ), चव्हाट गल्ली, खंजर गल्ली भागात हे कॅमेर बसवले जाणार आहेत.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.