Wednesday, May 1, 2024

/

पोटनिवडणुकीसाठी दुपारी 1 पर्यंत 22.49 टक्के मतदान : बेळगाव ग्रामीण आघाडीवर

 belgaum

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज शनिवार दि. 17 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत एकूण 22.49 टक्के इतके मतदान झाले होते. यामध्ये सर्वाधिक 36.27 टक्के मतदान बेळगाव ग्रामीण मतदारसंघांमध्ये झाले आहे हे विशेष होय.

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीचे मतदान आज शनिवारी सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. चोख पोलिस बंदोबस्तात तसेच कोरोना संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करून सदर मतदान प्रक्रिया राबविली जात आहे. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज दुपारी 1 वाजेपर्यंत संपूर्ण मतदारसंघात एकूण 22.49 टक्के मतदान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक 33.27 टक्के इतकी मतदानाची नोंद बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघांमध्ये झाली आहे. त्याखालोखाल बैलहोंगल, सौंदत्ती -यल्लम्मा आणि अरभावी विधानसभा मतदारसंघांचा क्रमांक लागतो. आज दुपारी 1 वाजेपर्यंत मतदानाची सर्वात कमी टक्केवारी रामदुर्ग मतदार संघात (18.78 टक्के) नोंदविली गेली आहे.

या मतदारसंघात एकूण 8 विधानसभा मतदार संघ असून या मतदारसंघांमधील दुपारी 1 वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे आहे. बेळगाव उत्तर : सकाळी 9 वाजता 2.97 टक्के, सकाळी 11 वाजता 14.13 टक्के, दुपारी 1 वाजता 20 टक्के. बेळगाव दक्षिण : सकाळी 9 वाजता 2.8 टक्के, सकाळी 11 वाजता 12.75 टक्के, दुपारी 1 वाजता 20.28 टक्के. बेळगाव ग्रामीण : सकाळी 9 वाजता 9 टक्के, सकाळी 11 वाजता 19.48 टक्के, दुपारी 1 वाजता 33.27 टक्के. अरभावी : सकाळी 9 वाजता 5.2 टक्के, सकाळी 11 वाजता 9.23 टक्के, दुपारी 1 वाजता 21.47 टक्के. गोकाक : सकाळी 9 वाजता 5.84 टक्के, सकाळी 11 वाजता 18.17 टक्के, दुपारी 1 वाजता 19.17 टक्के. बैलहोंगल : सकाळी 9 वाजता 5.5 टक्के, सकाळी 11 वाजता 12.59 टक्के, दुपारी 1 वाजता 25 टक्के. सौंदत्ती-यल्लम्मा : सकाळी 9 वाजता 6.89 टक्के, सकाळी 11 वाजता 8.16 टक्के, दुपारी 1 वाजता 21.81 टक्के. रामदुर्ग : सकाळी 9 वाजता 6.45 टक्के, सकाळी 11 वाजता 9.19 टक्के, दुपारी 1 वाजता 18.78 टक्के.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.