बेळगाव शहर सी बी टी बस सेवा सांबरा विमान तळा पर्यंत सुरु करण्यात येणार आहे . बेळगाव ते श्रींगेरी या दोन नवीन स्लीपर बसेस सह २५ नवीन बस वायव्य कर्नाटक परिवहन मंडळाच्या ताफ्यात दाखल झाल्या .
सांबरा विमान तळाच्या बसेस पिरणवाडी ते सांबरा अश्या होणार असून व्हाया उद्यमबाग रेल्वे स्टेशन चन्नमाम सर्कल असं असणार असून याचे तिकीट दार केवळ २० रुपये आहे. विमानाच्या वेळेनुसार दररोज ८ बस फेऱ्या असणार असल्याची माहिती परिवहन मंडळाच्या सूत्रांनी दिली आहे . शाहू नगर खडे बाजार चन्नमा सर्कल ते आजम नगर या रूट वर देखील दररोज २८ फेऱ्याच्या नवीन बसेस देखील सुरु करण्यात आल्या आहेत