सी के नायडू क्रिकेट सामान्यांच्या यशस्वी आयोजन नंतर बेळगावातील कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या ऑटो नगर येथील स्टेडियम वर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावरील महिला खेळाडू खेळणार आहेत .
भारतीय महिला क्रिकेट अ संघाचे तीन टी २० सामने बेळगावातील स्टेडियम वर रंगणार आहे . बी सी सी आय चे हंगामी सचिव अमिताभ चौधरी यांनी बेळगावात भारत आणि बांगलादेश संघाचे तीन टी २० सामने होणार असल्याची माहिती दिली आहे . १२ डिसेंबर १४ डिसेंबर आणि १६ डिसेंबर रोजी असे तीन सामने बेळगावात तर २ ते ७ डिसेंबर दरम्यान ३ वन दे सामने हुबळीत आणि या अगोदर अलूर येथे दोन सराव सामने आयोजित करण्यात आले आहेत देशातील महिलांच्या क्रिकेटला चालना मिळावी या उद्देश्याने हे सामने बेळगावात आयोजित करण्यात आले आहेत
Trending Now