महाराष्ट्र एकीकरण समिती चे दोनवेळा उपमहापौर आणि एकदा महापौर झालेले आणि तीन वेळा आमदारकीची निवडणूक लढवलेले शिवाजी सुंठकर आज भाजपचे झाले. समितीच्या भगव्या झेंड्याची शपथ मोडून त्यांनी राष्ट्रीय पक्षाचा झेंडा धरला आहे. कोणता हा झेंडा घेतला हाती? असा प्रश्न विचारून समिती कार्यकर्ते आपला संताप व्यक्त करत असून सुंठकर तुम्ही चुकलात असेच म्हणण्याची वेळ आली आहे.
आज एका समारंभात सुंठकर यांनी भाजपचा झेंडा हातात धरला.शिवाजी सुंठकर यांनी पक्ष प्रवेशावेळी शेकडो माणस आणलेली मात्र दहा जणानीच अधिकृत प्रवेश घेतलाय त्यात सोमणगोंडा गौडा (बेळगुंदी),मष्णू पाटील (देसुर)भाऊ पाटील(माजी तालुका पंचायत अध्यक्ष, कंग्राळी)कृष्णा पाटील(ग्राम पंचायत सदस्य,नागेनहट्टी)परशुराम बाळेकुंद्री, मंन्नूर)भैय्याजी पाटील( ग्राम पंचायत सदस्य,कंग्राळी), वकील लक्षमोजी(कुकडोळी)
बसन्न भैरोजी(कुकडोळी), रमेशअंगडी(अंकलगी) हे समविष्ट आहेत.
यापैकी शिवाजी सुंठकर यांचा भाजप प्रवेश मराठी माणसासाठी धक्कादायक ठरला आहे.तालुका समिती मधील हेकेखोरीच्या राजकारणात समिती सोडण्याचा निर्णय घेतला असे सुंठकर सांगत आहेत यात वास्तव असले तरी स्वार्थाच्या राजकारणात त्यांनी समितीचे नुकसान करायचे नव्हते, असे मत सीमाभागातून व्यक्त होते आहे.तुमची इमेज बंडखोर होती ती आज तुम्ही खरी करून दाखवला आहे मराठी अस्मितेशी बेईमानी करून आजवर बेळगावात कोणीच यशस्वी झालेलं नाही तुम्हीही होणार नाही जनता सुज्ञ आहे नक्कीच तुम्हाला जागा दाखवेल.
सुंठकर यांच्या जाण्याने आता भाजपचे उत्तर मतदार संघातील इच्छुक वाढले आहेत. भाजप मध्ये असलेल्या मंडळींचेच काय चालना त्यात सुंठकर यांनी आगीतून फुफाट्यात उडी घेतली आहे.