अरे कुठं नेऊन ठेवलाय समिती माझी….
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या तालुका विभागात सध्या मटण देऊन कार्यकर्ते बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे, रविवारी एक वकिलाच्या फार्म वर अशीच पश्चिम भागात पार्टी रंगली होती.
एक हेकेखोर नेत्याने काही करून तिकीट मिळवण्यासाठी चंग बांधला आहे. त्यामुळेच कधी कुणा साध्या कार्यकर्त्याला अर्धा चहा न पाजवणारी ही व्यक्ती जेवण वाटत आहे, अशी चर्चा आहे.
शहरातल्या दक्षिणेत राहत असलेली खरं ग्रामीण मध्ये कार्यरत ‘जोडी’ मेळाव्याच निमित्त पुढं करून हेकेखोर नेत्यांचं तिकीट उमेदवारी साठी अहोरात्र झटत आहे हा देखील सध्या चर्चेचा विषय आहे.
समितीने दारू आणि मटणवर कधीच भर दिला नाही, पण सध्या सारे राजकारण हडकूट आणि रस्यावर अवलंबून राहु लागले असून ते देऊन नेते आपली पोळी भाजून घेण्याच्या प्रयत्नात दिसतात.
पूर्वी समितीचे कार्यक्रम पोहे, उप्पीट किंवा खारा चुरमोरे यावर होत. स्पर्धा नव्हती, कोणाला तिकीट मिळेलं ते चालत असे, सध्या स्थिती बदलली आहे, आपल्यालाच तिकीट पाहिजे असा हेकेखोर स्वभाव वाढला आहे, यामुळे सलग दोन वेळा समितीचे नुकसान झाले आहे.
यावेळीही असेच नुकसान करण्याचा बेत आत्तापासून दिसत आहे. या युवा कार्यकर्त्यांच्या मटणाच्या मेजवानीस ग्रामीण भागातली ताकत दाखवण्यासाठी दक्षिण आणि शहरातील आयात कार्यकर्ते अधिक होते. वारंवार तालुक्यातील प्रामाणिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवून सुद्धा बैठक घेतली जात नव्हती मात्र आता पुन्हा उमेदवारीचे डोहाळे लागल्याने युवकांची बैठक घेतली जात आहे अशी देखील चर्चा सुरु आहे.