Monday, April 29, 2024

/

समविचारी नगरसेवक कारवाईला घाबरले का ..

 belgaum

mahapalika buildingगेल्या ६१ वर्षा पासून लोकशाही मार्गातून चालत आलेल्या घटनेला अनुसरून सलेला जगातील एकमेव सीमा लढा आहे यासाठीच  एक नोव्हेंबर रोजी काळ्या दिनी मूक सायकल फेरीत उपमहापौरासह समविचारी गटाच्या नगरसेवकांनी टाकल्याने मराठी भाषिकातून त्यांच्या बद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. एकीकडे महापौर संज्योत बांदेकर यांनी बेधडक पणे सायकल फेरीत सहभाग दर्शवला तर समविचारी गटातील नगरसेवक कारवाईला घाबरले का असा प्रश्न विचारला जात आहे.

मूक सायकल फेरीच्या एक दिवस अगोदर आमदार संभाजी पाटील यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत सर्व नगरसेवकांना सहभाग स्वातंत्र्य दिले होत  उपमहापौर नागेश मंडोळकर यांनी मराठी विरोधी भूमिका घेत बैठकीतच आपणा काळ्या दिनाच्या सायकल फेरीत सहभागी होणार नसल्याचे सांगितल होत. नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी काळ्या दिनाची सायकल फेरी टाळण्यासाठी धार्मिक सहलींच आधार घेतला होता तर उपमहापौर रेणू मुतगेकर या आजारी पणाचे निमित्य करत फेरीत गैरहजर होत्या. वास्तविक पाहता मराठीच्या तळमळीसाठी कोणत्याही परिस्थितीत मूक सायकल फेरीत हजर राहणे गरजेचे असताना समविचारी आघाडीच्या नगरसेवकांनी काळ्या दिनाच्या सायकल फेरीत गैर हजर राहून काय सिद्ध केलंय असा प्रश्न विचारला जात आहे.अनेक ग्राम पंचायत जिल्हा पंचायत तालुका पंचायत ए पी एम सी सदस्य काळ्या दिनाच्या मूक सायकल फेरीत सहभागी झाले होते.नगरसेवक विजय पाटील यांनी दुःखात असतेवेळी निधन झालेल्या आपल्या आई आणि काकांचे दिवस असतेवेळी देखील काळ्या दिनाच्या सायकल फेरीत सहभागी झाले होते.

बेळगाव live कडे मिळालेल्या माहिती नुसार ३२ मराठी नगरसेवका पैकी खालील नगरसेवकांनी मूक सायकल फेरीस हजेरी लावली होती  त्यांची नावे अशी आहेत

 belgaum

संज्योत बांदेकर ,सरिता पाटील ,आमदार संभाजी पाटील ,किरण सायनाक पंढरी परब,महेश नाईक,अनंत देशपांडे,रतन मासेकर विजय भोसले विजय पाटील ,राजू बिरजे,राजेश पलंगे माया कडोलकर मधुश्री पुजारी, पुंडलिक परिट,वैशाली हुलजी, मोहन बेळगुंदकर,मनोहर हलगेकर दिनेश रावळ,संजय शिंदे शिवाजी कुडूचकर, माया कडोलकर वैशाली हुलजी ,चोपडे  हे सामील आहेत.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.