डॉक्टरना देवाचे प्रतिरूप म्हणून ओळखले जाते, मात्र बेळगावचे हार्ट स्पेशालिस्ट डॉ एम डी दीक्षित यांना त्यांचे रुग्ण प्रत्यक्षात देव मानतात. हजारो हृदय रुग्णांना वाचविलेले हे देवरूपी व्यक्तिमत्व सध्या रोबोटीक हार्ट सर्जरीत अग्रेसर ठरले आहे. या पद्धतीच्या माध्यमातून त्यांनी मागील तीन महिन्यात सहा रुग्णांना बरे केले आहे.
डॉ एम डी दीक्षित हे बेळगावच्या केएलई इस्पितळात कार्यरत होते. आता ते बंगळूर आणि देशातील सर्वच मोठ्या शहरात कार्यरत ऍस्टर सीएमआय हॉस्पिटल मध्ये सेवा देत आहेत. कुशल डॉक्टरांच्या पथकाचे ते प्रमुख आहेत. बेळगावच्या या डॉक्टरांनी हे नवे रोबोटीक तंत्र अवगत केले असून याद्वारे कमी त्रासात बायपास सारख्या अवघड शस्त्रक्रियाही ते करत आले आहेत.
काय आहे ती पद्धत?
हृदय शस्त्रक्रिया करताना साधारणपणे ब्रेस्ट बोनला छेद घ्यावा लागतो. मात्र या रोबोटीक पद्धतीत हृदयाच्या डाव्या बाजूच्या मायट्रेल व्हॉल्व्ह ला केवळ २.५ ते ३.५ इंचाचा छेद दिला जातो, यामुळे चिरफाड कमी होऊन रुग्णाला कमी त्रास होतो.
अशा शस्त्रक्रियेत रोबोट चा मास्टर कंट्रोलर म्हणून डॉ दीक्षित काम करतात. ही अभिमानाची गोष्ट आहे.
या शस्त्रक्रियेत रुग्णांना वेदना कमी होतात, रक्तस्त्राव फारच कमी होतो, फक्त तीन ते चार दिवस इस्पितळात राहून रुग्ण घरी जाऊ शकतो. आणि ओपन हार्ट सर्जरीला जितका खर्च येतो तितकाच खर्च या रोबोटीक हार्ट सर्जरीलाही येतो अशी माहिती मिळाली.
Trending Now