तीन दिवसांपूर्वी अंगणात खेळताना बेपत्ता झालेली कोंडस्कोप येथील चिमुरडीच शव पाण्याच्या टाकीत आढळला आहे.
सृष्टी पुंडलिक कुडचिकर वय दीड वर्ष अस या मयत मुलीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी सृष्टी च्या चार घरं बाजूला गजानन कृष्णा डोंगरे यांच्या गोठयातील पाण्याच्या टाकीत हा मृतदेह आढळला आहे.जनावरांना पाणी पाजण्यासाठी टाकीचे झाकण उघडताच वास आला त्यानंतर संशय आल्याने तपासणी केली असता चिमुकलीचा मृतदेह या टाकीत आढळला आहे .टाकीत दीड वर्षीय बालिका कशी पडली याच नेमकं कारण काय याचा तपास पोलीस निरीक्षक एस सी पाटील करताहेत.