1 नोव्हेंबर कर्नाटक राज्योत्सवदिनी प्रादेशिक मान्यता असलेला अधिकृत ध्वज फडकवा अन्यथा राज्य सरकार विरोधात जनहित याचिका दाखल करू असा इशारा आर टी आय कार्यकर्ता भिमाप्पा गडाद यांनी दिला आहे.
बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्यातील जनतेच्या रेट्यामुळे ध्वजास कायदेशीर मान्यता मिळावी म्हणून 9 सदस्यांची समिती तयार करण्यात आली आहे .समिती बनवुन गेले 5 महिने या समितीची एकही बैठक झालेली नाही. राष्ट्र ध्वजास धक्का न लावता राज्यांनी प्रादेशिक ध्वजास मान्यता देऊ शकतो अस मत राज्याचे अडव्होकेट जनरल यांच मत आहे त्यामुळे प्रादेशिक ध्वजास मान्यता देऊ शकते अस देखील भिमाप्पा गडाद म्हणाले.
आगामी एक नोव्हेंम्बर राज्योत्सव दिनी प्रादेशिक ध्वज सरकारने फडकावावा अन्यथा याविरोधात सरकार विरुद्ध जनहित याचिका दाखल करू अस गडाद म्हणाले.