येळ्ळूर येथे झालेल्या मारहाण प्रकरणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने दोघांनी आपली साक्ष मानव हक्क आयोगासमोर नोंदवली आहे.
प्रकाश लक्ष्मण पाटील आणि मनोहर ईश्वर पाटील अशी त्यांची नाव आहेत. मारहाण प्रकरणी यांनी तसेच महाराष्ट्र सरकारचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मानव हक्क आयोगासमोर फिर्याद दाखल केली होती.
कर्नाटकाने याप्रकरणी ५०० पानांचा खोटा अहवाल सादर केला आहे, कानडी पत्रकार आणि छायाचित्रकारांना मारहाण झाल्याचे म्हटले आहे, मात्र मराठी पत्रकारांचे जवाब घेतले नाहीत असे साक्षीत स्पष्ट करण्यात आले आहे.