तीनवेळा केवळ नशिबाने खासदार झालेले सुरेश अंगडी सध्या ब्रिटिशकालीन रेल्वे ओव्हरब्रिजचे भूमिपूजन करून मोकळे झाले. ते आणि इतर काहीजण जुन्या धारवाड रस्त्यावरील ओव्हरब्रिज यंदाच म्हणजे डिसेंबर २०१७ च्या अखेरीपर्यंत पूर्ण होईल असे सांगत आहेत. नव्या ब्रिज साथीच्या घाईत ही थाप ठोकताना अंगडी यांनी एकदा तरी या ब्रिजच्या कामाची पाहणी केली असेल का, पाहणी केली असती तर ते असे बोलूच शकले नसते. खासदारांच्या घोषणेनंतर बेळगाव live ने जुन्या धारवाड रस्त्यावरील या ब्रिज कामाचा आढावा घेतला आणि या डिसेंबर की पुढच्या डिसेंबर ला पूर्ण होणार हे ब्रिज असा प्रश्न निर्माण होतोय.
उर्वरित दोन अडीज महिन्यात धारवाड रस्त्याचे ब्रिज पूर्ण करून त्याचे लोकार्पण शक्यच होणार नाही. या कामाच्या निविदेनुसार कालावधी आहे १८ महिन्यांचा , जानेवारी २०१७ ला काम सुरू झाल्याने ते पूर्ण होण्यास २०१८ चा सप्टेंबर येणार आहे. मग अशा दिशाभूल करणाऱ्या घोषणा का होतात? कारण राजकारणी गडबडीत आहेत आणि निवडणूका जवळ आल्यात.
अतिशय सामान्य माणसाने ही जाऊन पाहणी केली तर हे काम किती अपुरे आहे आणि ते पूर्ण होण्यास किती वेळ लागेल याची प्रचिती येऊ शकते. काही अतिउत्साही राजकारणी तर ब्रिटिशकालीन ब्रिजही केवळ १० महिन्यात पूर्ण करायला निघाले आहेत म्हणे, हा विनोद आहे की हे आम्ही आमच्या काळात केले असे त्यांना दाखवायचे आहे, हेच कळत नाही.
विकास करणे हे निवडून आलेल्या व्यक्तीचे कर्तव्य आहे. हे कर्तव्य पार पाडताना श्रेयवाद का? पण सध्या विकासापेक्षा श्रेय घेणारच जास्त झाले आहेत, याचीच अनुभूती येते .
धारवाड रस्त्याच्या ब्रिजच्या बांधकामावर जाऊन पाहिले की कांय किती महिन्यात पूर्ण होईल याची कल्पना येईल. बेळगाव live च्या माध्यमातून आता आमची एकच विनंती या घोषणा बहाद्दूरांना आहे, एकदा जाऊन बघून या आणि मग बोला !
फोटो सौजन्य-aab
फक्त अंगड़ी आणि भाजपा चा विरोध हेच या पेज चे उद्दिष्ट दिसते.