मबेळगावला दुसऱ्या राजधानीचा दर्जा देण्यासाठी कर्नाटकाने येथे सुवर्णविधानसौध उभारले. सरकारी अधिकारी आणि मंत्रीना ये जा करण्यासाठी हेलिपॅड ही उभारण्यात आले, मात्र आज हे हेलिपॅड की गायरान म्हणण्याची परिस्थिती दिसते.
२० लाख रुपये खर्च करून हे गायरान उभारण्यात आले आहे. कुणाच्या बापाचे काय जाते कारण जनतेचा कररूपी पैसे उधळण्याचा विडाच या राज्यकर्त्यांनी उचलला आहे, यामुळे हे हेलिपॅड पूर्णपणे मोडकळीस आले आहे.
त्यावर पूर्ण गवत उगवले आहे. देखभाल नसल्याने हे हेलिपॅड गायरान मध्ये रूपांतरित झाले आहे. आता ते सुधारण्यासाठी किमान आणखी ५ ते १० लाख रुपये खर्च करण्याची वेळ आली आहे.
सुरक्षा, रहादरीतून मुक्ती अशी करणे देऊन मागच्या वर्षी ही हेलिपॅडची निर्मिती झाली आहे. वर्षातून एकदा अतिमहनिय राजकीय पुढाऱ्यांसाठी त्याचा वापर होतो बाकीच्या वेळी ते काहीच उपयोगाचे नाही पण किमान देखभाल तरी व्हायला पाहिजे होती, पण ते झालेले दिसत नाही.
“सरकारी काम हे देवाचे काम” असे वाक्य बंगळूर येथील विधानसभा प्रवेशद्वारावर लिहिले आहे. बेळगावातील या परिस्थितीने या देवकार्याची प्रचितीच येऊ लागली आहे.
Trending Now