काडा कार्यालयात झालेल्या प्रशासकीय बैठकीनंतर तडकाफडकी खासदार सुरेश अंगडी यांनी केलेली रेल्वे उड्डाण पुलाच्या पूजेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.भाजपचे काही पदाधिकारी रेल्वेचे अधिकारी, पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अंगडी यांनी भूमी पूजा केली आहे. शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत भाजपचे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार नेते आणि काही नगरसेवकांचा सहभाग होता माजी आमदार भाजप जिल्हा अध्यक्ष तर ए डी सी सुरेश इटनाळ यांच्याच बाजूला बसले होते त्यामुळे अधिकाऱ्या पेक्षा ही बैठक भाजपचीच अधिक वाटत होती.इतर पक्षाचे आमदार आणि लोकप्रतिनिधींची वानवा बैठकीत जाणवत होती त्यामुळे अधिकाऱ्याच्या बैठकीत भाजप नेत्यांचं काय काम? असा प्रश्न विचारला जात आहे.
खासदार अंगडी यांनी भूमी पूजन केले असलं तरी जिल्हाधिकारी एस जिया उल्ला यांनी उध्या पासून काम सुरू करायला अधिकृत परवानगी दिली नसल्याची माहिती मिळाली आहे त्यामुळं या कामात भाजपचा श्रेयवाद समोर आला आहे.
सदर उड्डाणपूल सहा मीटर उंचीचा ,चार लेन 50 फूट रुंद असा होणार आहे 18 महिन्याची वेळ हे उड्डाण पुलाच काम करण्यासाठी दिलं गेलं आहे. जर का उध्या पासून कामाची सुरुवात झालीच तर पुढील 18 महिने ट्रॅफिक डायवर्षन असणार आहे.